बोगस पदवी रॅकेट प्रकरण : मास्टरमाईंडला नागपुरातून ठोकल्या बेड्या

चंद्रपूर : प्रतिनिधी
नामांकित विद्यापीठांच्या ५ ते १० लाख रुपयांत बनावट पदव्या व गुणपत्रिका विकणा-या रॅकेटच्या मास्टरमाईंडला पोलिसांनी नागपुरातून बेड्या ठोकल्या आहेत. परिमल बाबूराव गौरकर असं या आरोपीचं नाव आहे. त्याला नागपूरमधील हॉटेलमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यासोबतच बनावट स्टॅम्प व कागदपत्रं तयार करणा-या त्याच्या नागपूरचा साथीदार अक्षय खोब्रागडे यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी दुर्गापूर पोलिसांनी बनावट पदवी विक्री प्रकरणी वैभव सोनुले याला अटक केली. मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार परिमल गौरकर हा फरार होता.

बनावट पदवी प्रकरणातील मास्टरमाईंड अक्षय खोब्रागडे याच्याकडं कॅनडातून मिळवलेली पीएचडी आहे. त्यानं ती ऑनलाइन शिक्षण घेऊन मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र ही पीएचडी खरंच ऑनलाइन शिक्षण घेऊन मिळवली की रॅकेटचा वापर करून तयार केली, याबाबतचा तपास चंद्रपूर पोलीस करत आहेत.

कुलगुरू म्हणतात, पदवी, कागदपत्रं बनावट
दुर्गापूर पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व पदवी, गुणपत्रिका व कागदपत्राबाबत सहा विद्यापीठांना गुरुवारी पत्र पाठवून अहवाल मागितला होता. शुक्रवारी काही विद्यापीठातील कुलगुरूंनी त्या डिग्री व कागदपत्रांबाबत माहिती दिली. या पदव्या आणि कागदपत्र बनावट असल्याचं या कुलगुरूंनी पोलिसांना तोंडी सांगितलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोठडीतून होणारउलगडा
पदवी प्रकरणातील मास्टरमाईंड परिमल गौरकर आणि बनावट कागदपत्रं छापणारा अक्षय खोब्रागडे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. चौकशीदरम्यान या दोघांनी आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे बोगस पदव्या विकल्या, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, या बोगस पदव्यांच्या आधारे कोणी सरकारी वा खासगी नोकरी मिळवली आहे का, याचे मोठे नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष शेगोकार यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01
Video thumbnail
LIVE- लातुरात पावसाची जोरदार बॅटिंग; बळीराजा सुखावला
04:18
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेट सक्तीवरून वाद! नागरी हक्क समितीचा विरोध
03:14
Video thumbnail
Latur Contractor Sucide|थकीत बिलं आणि गुत्तेदाराची आत्महत्या; घटनेने उडाली खळबळ
02:13
Video thumbnail
Nanded|स्मशानभूमी नाही म्हणून तरुण थेट सरणावर झोपला! नांदेडमध्ये अनोखे आंदोलन
00:39
Video thumbnail
Latur|चिमुकल्यांचा जीव धोक्यात? वडवळ नागनाथच्या अंगणवाडीची धक्कादायक अवस्था
00:58
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21

Latest news