जागतिक जीडीपीमध्ये ब्रिक्स देशांचा वाटा ४० टक्क्यांवर

पुतीन, मोदींचा दावा, पाश्चात्य देशांच्या जी-७ वर टीका
ब्रिक्स जगाच्या निम्म्या
लोकसंख्येचे घर : मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ब्रिक्स परिषद सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह ब्रिक्स नेत्यांनी ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये जागतिक व्यापारावर चर्चा केली. यावेळी पुतीन यांनी अमेरिका आणि युरोपवर टीका करीत पश्चिम भाग आता कमकुवत होत आहे. हे देश स्वत:ला जी ७ का म्हणतात? जगाच्या एकूण जीडीपीपैकी ४० टक्क्यांहून अधिक वाटा ब्रिक्स देशांचा आहे तर जी ७ चा वाटा केवळ २९ टक्के आहे, असे म्हटले. यानंतर पंतप्रधान मोदींनीही जगाच्या निम्म्या लोकसंख्येचे घर असलेल्या ब्रिक्स देशांचा जगाच्या जीडीपीत ४० टक्के वाटा असल्याचे म्हटले. या देशांत भारताला व्यापार वाढवायचा आहे. त्यासाठी सुरक्षित सागरी मार्ग आवश्यक असल्याचे म्हटले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी क्रयशक्ती समानतेच्या आधारावर जागतिक अर्थव्यवस्थेत ब्रिक्सचा वाटा अंदाजे ४० टक्के तर जी ७ चा २९ टक्के आहे. याचा अर्थ ब्रिक्स आर्थिक आकारमानाने पुढे आहे. तथापि, जी ७ ला कमकुवत मानले जाऊ शकत नाही. डॉलर, बँकिंग, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील त्याचा प्रभाव लक्षणीय आहे. दुसरीकडे ब्रिक्सची ताकद त्याच्या मोठ्या लोकसंख्येत, नैसर्गिक संसाधनांत आणि वेगाने वाढणा-या अर्थव्यवस्थांत आहे.

यावेळी मोदी म्हणाले की, ब्रिक्स देशांमध्ये जगाची निम्मी लोकसंख्या आहे. हे देश जगाच्या जीडीपीमध्ये ४० आणि जागतिक व्यापारात २५ टक्क्यांपेक्षा जास्त योगदान देतात. अलिकडच्या वर्षांत जगाचा जीडीपी जवळपास अडीच पटीने वाढला तर ब्रिक्स देशांचा जीडीपी साडेचार पटीने वाढला. याचा अर्थ ब्रिक्स अर्थव्यवस्था उर्वरित जगाच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने वाढली आहे. ब्रिक्स देश आता नवोन्मेष आणि नवीन तंत्रज्ञानाची प्रमुख केंद्रे बनत आहेत. भारतात आयोजित होत असलेला हा ब्रिक्स बिझनेस फोरम आतापर्यंतचा सर्वात मोठा मंच आहे.

मोदींना रशिया
भेटीचे निमंत्रण
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात भारत मंडपम येथे ४५ मिनिटांची बैठक झाली. त्यानंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून औद्योगिक प्रदर्शनाकडे गेले. या बैठकीत भारत-रशिया संबंधांवर, तसेच मध्य पूर्व आणि काळ््या समुद्रातील परिस्थितीवर चर्चा झाली. पुतिन यांनी मोदींना २४ व्या भारत-रशिया शिखर परिषदेसाठी रशियाला येण्याचे निमंत्रण दिले. ते मोदींनी स्वीकारले.

आजपासून २ दिवस
दिल्लीत ब्रिक्स परिषद
भारताने १८ व्या ब्रिक्स समिटचे आयोजन केले असून १२ सप्टेंबर आणि १३ सप्टेंबरला नवी दिल्लीत भारत मंडपम येथे ही शिखर परिषद संपन्न होणार आहे. या परिषदेपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यात भारत मंडपममध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेत पुतीन यांचे स्वागत केले.

ट्रम्प यांना झटका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षीच्या ब्राझीलमधील ब्रिक्स परिषदेवेळी मोठे वक्तव्य केले होते. ब्रिक्स देशांनी डॉलरचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर १०० टक्के टॅरिफ लादू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्यानंतर आता ब्रिक्सने पाश्चात्य देशांना लक्ष्य केल्याने ट्रम्प यांना हा धक्का मानला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news