सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मुलांसाठी सुरक्षित बनविणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना मुलांसाठी अधिक सुरक्षित बनविण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असतानाच मुलांच्या लैंगिक शोषणासह बालसुरक्षेशी संबंधित बाबींची माहिती योग्य त्या कायदे अंमलबजावणी करणा-या संस्थांना देण्यास मेटाने सहमती दर्शवली. ऑनलाइन बाल सुरक्षा ही भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची सर्वोच्च जबाबदारी आहे आणि या संदर्भात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

हानिकारक माहितीला आळा घालण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससोबत सातत्याने चर्चा करत असल्याचे सरकारने सांगितले. तसेच भारतात कार्यरत असलेल्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी मुलांची ऑनलाइन सुरक्षा हे एक मूलभूत तत्त्व आहे, हेदेखील सरकारने स्पष्ट केले. भारतात कार्यरत असलेल्या कोणत्याही सोशल मीडियासाठी मुलांची ऑनलाइन सुरक्षा हे एक मूलभूत तत्त्व आहे आणि त्याबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असेही सांगण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, मुलांना इंटरनेटवरील लैंगिक शोषण आणि हानिकारक सामग्रीपासून वाचविण्यासाठी भारत सरकार सोशल मीडिया कंपन्यांवरील कारवाई अधिक कडक करण्याची तयारी करत आहे. मुलांशी संबंधित आक्षेपार्ह सामग्री त्वरित ओळखली जावी आणि प्लॅटफॉर्मवरून काढून टाकली जावी, हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससोबत सातत्याने संवाद साधत आहे. या संदर्भात मेटाने बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांची माहिती संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणा-या संस्थांना देण्यास सहमती दर्शवली आहे.

कायद्याची अंमलबजावणी करणा-या संस्थांसोबत माहिती सामायिक करण्याचा मेटाचा करार महत्त्वाचा असून, सरकार बालकांच्या सुरक्षेच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल मानत आहे. यामुळे संस्था मुलांना होणा-या ऑनलाइन गुन्ह्यांच्या प्रकरणांचा तपास करण्यास मदत होऊ शकते. सरकारचे म्हणणे आहे की, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सनी मुलांच्या सुरक्षेला आपली प्राथमिक जबाबदारी मानले पाहिजे. जर कोणतीही कंपनी या दिशेने आवश्यक पावले उचलण्यात अयशस्वी ठरली तर नियमांनुसार तिच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

मुलांशी संबंधित आक्षेपार्ह
सामग्रीवर देखरेख ठेवणार
मुलांना हानी पोहोचवू शकणारी किंवा लैंगिक शोषणाशी संबंधित असलेली सामग्री ओळखण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे. तक्रार मिळाल्यानंतर केवळ अशी सामग्री काढून टाकण्याऐवजी सोशल मीडिया कंपन्यांनी ती ओळखण्यासाठी आणि रोखण्यासाठी सक्रिय यंत्रणा विकसित करावी, यासाठी अधिकारी त्यांना प्रोत्साहित करीत आहेत. संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणा-या संस्थांसोबत माहिती सामायिक करण्याच्या मेटाच्या कराराला सरकार या दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानत आहे.

मेटासोबत इतर सोशल
मीडियाही रडारवर
सरकारला केवळ मेटापुरते मर्यादित राहायचे नाही. अधिकारी इतर सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससोबतही चर्चा करत आहेत. मुलांशी संबंधित आक्षेपार्ह आणि बेकायदेशीर सामग्री त्वरित ओळखली जावी आणि ती काढून टाकण्यासाठी प्रभावी पावले उचलली जावीत, हे सुनिश्चित करणे हा यामागील उद्देश आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news