स्मृती मानधनाने रचला इतिहास!;महिला टी-२० क्रिकेटमध्ये नोंदवला नवा ‘विश्वविक्रम’

नवी दिल्ली : महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणा-यांच्या यादीत आता स्मृती मानधना अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यादरम्यान, भारतीय सलामीवीर मंधानाने न्यूझिलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकत हा टप्पा गाठला आहे.

बेट्सला मागे टाकण्यासाठी स्मृती मानधनाला केवळ सात धावांची गरज होती. आजच्या सामन्यात तिने तिस-या षटकात एका शानदार चौकारासह ही कामगिरी पूर्ण केली. तिने भारताला सामन्यात दमदार सुरुवात करून दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आशिया चषक स्पर्धेतही स्मृतीने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेतील ती दुस-या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली होती. तिने या स्­पर्धेत एकूण २१३ धावा केल्या. हाँगकाँग-चीनविरुद्ध शतकही झळकावले होते. आता स्मृती मानधना महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मानधनाने पहिल्याच षटकात चौकार मारून सुरुवात केली. मात्र, त्या चौकारानंतर तिने फलंदाजीची धुरा शफाली वर्माकडे सोपवली. बांगलादेशच्या गोलंदाजांवर आक्रमकपणे धावा करण्यास वाव दिला. तिस-या षटकात स्मृती मानधनाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत सलग दोन चौकार फटकावले. त्यातील एका चौकाराने तिने विश्­वविक्रमाला गवसणी घातली. यानंतर तिने मुक्तपणे फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पॉवरप्ले दरम्यान १९ चेंडूंत ३७ धावा करून मंधाना बाद झाली; पण टीम इंडियाला दमदार सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी तिने अचूकपणे पार पाडली.

टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पाही गाठला
मंधानाने दोन षटकार ठोकले आणि भारताने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. या षटकारांमुळे मंधानाने महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करण्याचा टप्पाही गाठला; यासह सोफी डिव्हाईन, डिएंड्रा डॉटिन आणि चमारी अथापथू यांच्या यादीत तिचा समावेश झाला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पिकं घटली अन् बाजार समिती ओस पडली! जळकोटमध्ये दुष्काळाचा दुहेरी फटका
01:47
Video thumbnail
Latur| सौ.आदितीताई देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट; दोन शिलाई मशीन दिल्या!
04:04
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56

Latest news