जिल्हा नियोजन समितीत अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र निधी; मुस्लिम अधिकार परिषदेचे वहिद पटेल यांची माहिती

परभणी : राज्यातील अल्पसंख्याक घटकांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत स्वतंत्र तरतूद करण्यासाठी मुस्लिम अधिकार परिषदेचे अध्यक्ष वहीद पटेल यांनी पाठपुरावा केला होता. मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मंगळवारी वहीद पटेल यांनी भेट घेऊन या मागणीचा पुन्हा पाठपुरावा केला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी यापुढे जिल्हा नियोजन समितीच्या निधीत अल्पसंख्याक घटकांसाठी स्वतंत्र निधी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिल्याचे मुस्लिम अधिकार परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

या स्वतंत्र निधीमुळे अल्पसंख्याकबहुल वस्त्यांमधील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य तसेच इतर मूलभूत आणि समाजोपयोगी विकासकामांना निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकांच्या विकासासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येते. त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्षही उपलब्ध आहे. मात्र, अल्पसंख्याक समाजासाठी अशा प्रकारची स्वतंत्र आर्थिक तरतूद किंवा स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध नसल्याने अल्पसंख्याकबहुल भागातील विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून देताना अडचणी येत होत्या.

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा नियोजन समितीच्या निधीत स्वतंत्र तरतूद करावी आणि त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करावे, अशी मागणी मुस्लिम अधिकार परिषदेच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेही या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. उपमुख्यमंत्र्यांनी उपरोक्त मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अल्पसंख्याक घटकाच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी| Ekmat Digital
28:13
Video thumbnail
Latur|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
02:12
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29

Latest news