मराठवाड्यातील १५ हजार न्यायालयीन कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या धर्तीवर इतर न्यायालयातील कर्मचा-यांनाही समान काम समान वेतनाच्या धर्तीवर वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचारी संघटनेने शुक्रवारी ता. १६ ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लाऊन कामकाज सुरु केले आहे. मराठवाड्यातील १५ हजार न्यायालयीन कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून आंदोलन केले.

शासनाने मुंबई उच्च न्यायालयातील न्यायालयीन कर्मचा-यांना सुधारित वेतनवाढीचा लाभ दिला आहे. मात्र उच्च न्यायालया व्यतिरिक्त इतर न्यायालयात काम करणा-या कर्मचा-यांना सुधारित वेतनश्रेणी लागू केली नाही. त्यामुळे कर्मचा-यावर हा अन्याय असल्याची भावना व्यक्त करून सर्व जिल्हा न्यायालयीन कर्मचा-यांनाही सुधारित वेतनवाढ लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी जिल्हा न्यायालयीन कर्मचा-यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शनिवारी देखील काळ्या फिती लावून कामकाज केले जाणार आहे. या आंदोलनात मराठवाडयातील आठही जिल्हयातील सुमारे १५ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.

या आंदोलनानंतरही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ता. ५ नोव्हेंबर रोजी सर्व न्यायालयीन कर्मचारी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत.
या शिवाय त्यानंतर आंदोलन आणखी तीव्र करीत ता. १७ नोव्हेंंबरपासून राज्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान, त्यानुसार आज हिंगोली न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी गट क संघटना, बेलीफ संघटना, लघुलेखक कर्मचारी संघटना, शिपाई गट ड संघटना यांनी काळ्या फिती लावून या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.

शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा : देशमुख
न्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्ष सचिन देशमुख म्हणाले की, समान काम समान वेतन हि आमची मागणी आहे. त्यानुसार हे आंदोलन केले जात आहे. जे काम वरिष्ठ न्यायालयातील कर्मचारी करतात तेच काम जिल्हा व इतर न्यायालयातील कर्मचारी करतात. न्यायालयीन कर्मचा-यांच्या मागण्या रास्त असून शासनाने यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
48:16
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन
02:29
Video thumbnail
Latur Drought|पाच हजारांची मदत देऊन फडणवीस सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा?
09:48
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|जिल्हा बँकेच्या कामांच्या विश्वासावर निवडणूक लढवतोय! धिरज देशमुखांचा दावा
05:15
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34

Latest news