५१ तास अखंड संगीत महायज्ञास प्रारंभ
लातूर : प्रतिनिधी
श्री.ज्ञानसरस्वती मंदीर संस्थान, सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर आणि मराठवाडा संगीत कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५१ तास अखंड संगीत महायज्ञाचा शानदार शुभारंभ दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका तथा सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आस्था गोडबोले – कार्लेकर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालमणी डॉ. राम बोरगावकर, अतिथी म्हणून द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील, सुप्रसिद्ध गायक पं.प्रदीप चिटणीस, मुंबई, सुविख्यात सितार वादक आदित्य देशमुख, मुंबई, सुरमणी पं.बाबुराव बोरगावकर, सुनीता बोरगावकर उपस्थित होते. सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी वृंदांच्या वतीने पंचदेवतांचे स्तवन अत्यंत सुरेल स्वरात समूहाने सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांना उत्स्फूर्त तबलासंगत प्रा.गणेश बोरगावकर आणि प्रा. विश्वनाथ स्वामी यांनी केली तर हार्मोनियमसाथ सुरमणी पं.बाबुराव बोरगावकर यांनी केली. यावेळी कार्लेकर म्हणाल्या की, वर्तमानाच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगात माणसाला  मन:शांती संगीत साधनेतून,किर्तन व भजनातून त्यासाठी साधना आणि समर्पण महत्वाचे आहे.
पं. चिटणीस यांनी राग यमन मध्ये बडाख्याल ‘सुमरण करो मै’ ही बंदिश अतिशय तयारीने सादर केली. त्यानंतर त्यांनी तीनताल मध्ये छोटाख्याल सादर करून ‘परमेश्वर सरस्वती देवी’ ही बंदिश आळवून श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दात घेतली. त्यांना तबलासाथ प्रा. राजेंद्र भोसले, हार्मोनियमसाथ प्रा. लक्ष्मण श्रीमंगले यांनी दिली. पं.विलास गारोळे यांनी भक्तीसंगीत आणि भारुड सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद घेतली त्यांना प्रा.विनोद राणे यांनी तबल्यावर बहारदार साथ दिली. त्यानंतर ऋतुजा पिंगळे – जगदाळे यांनी शास्त्रीय आधारित भक्तीसंगीत सादर केले त्यांना प्रा. गणेश बोरगावकर यांनी तबला साथ तर प्रा. लक्ष्मण श्रीमंगले यांनी हार्मोनियम साथ दिली. ग्लोबल नॉलेज स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या चमूने देशभक्तीपर गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. तबला स्वात प्रा. तुकाराम आवाड आणि हार्मोनियमसाथ प्रा.गोकर्णा जाधव यांनी दिली. सुरमणी पं.बाबुराव बोरगावकर यांनी राग जोगमध्ये बडाख्याल आळवला त्यानंतर त्यांनी राग विलास आणि थोडी मध्ये बंदिश आणि राग कलावती मध्ये छोटाख्याल बंदिश तयारीने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तालमणी डॉ. राम बोरगांवकर यांनी उत्तररात्रीत उत्स्फूर्तपणे ताल तीनताल आणि ताल गणेशताल मध्ये सोलो तबलावादन करून आपली संगीत सेवा ज्ञानसरस्वती मातेच्या चरणी अर्पण केली.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.सुदाम पवार आणि प्रा.विश्वनाथ स्वामी यांनी केले. याप्रसंगी लातूर शहर प­रिसरातील रसिक-श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……………………६……………..

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
48:16
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन
02:29
Video thumbnail
Latur Drought|पाच हजारांची मदत देऊन फडणवीस सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा?
09:48
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|जिल्हा बँकेच्या कामांच्या विश्वासावर निवडणूक लढवतोय! धिरज देशमुखांचा दावा
05:15
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47

Latest news