साकीनाक्यातील आगीत दोघांचा होरपळून मृत्यू; चौघे जण गंभीर

​मुंबई : प्रतिनिधी
अंधेरी पूर्व येथील साकीनाका, खैराणी रोडवरील एका व्यावसायिक व निवासी संकुलाला मंगळवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.

जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग आटोक्यात आणली.

​खैराणी रोडवरील अब्दू रशीद कंपाऊंडमधील तळमजला अधिक एक मजली गाळे व चाळींमध्ये मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास आग भडकली. सुरुवातीला काही दुकानांपुरती मर्यादित असलेली ही आग बघता-बघता सुमारे ६० ते ७० व्यावसायिक गाळे आणि घरांमध्ये पसरली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने सायंकाळी ६.३७ वाजता ‘लेव्हल-२’ आग जाहीर केली.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर तयार गार्मेंट, प्लॅस्टिक दाणे, भंगार, लाकडी फर्निचर, रिकामे अ‍ॅरोसॉल कंटेनर्स आणि एलपीजी सिलिंडरचा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. तसेच रस्त्यावर उभी असलेली दोन दुचाकी वाहने आणि एक टेम्पोही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आठ फायर इंजिन, सहा जंबो टँकर्स आणि इतर विशेष उपकरणांच्या मदतीने आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44
Video thumbnail
Latur|लातूरच्या आंबेडकर पार्कवर खासगी वाहनांचे अतिक्रमण? भीमसैनिक आक्रमक; आंदोलनाचा इशारा
01:50
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध
02:46
Video thumbnail
Latur District Bank Election 2026|धीरज देशमुख यांची लातूर जिल्हा बँकेत बिनविरोध निवड
01:31
Video thumbnail
Latur Crime News|शेकडो नागरिकांसमोर युवकावर कोयत्याने वार; औसा शहरात खळबळ
00:54
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा उत्सव | हल्ला मोहल्ला आणि भव्य नगरकीर्तन
04:43
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते ‘मिरा सारीज’चे थाटात उद्घाटन
03:33
Video thumbnail
Vijayadashami 2026|बाभळगावात धीरज देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पारंपरिक अश्वपूजन
01:41
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
44:57
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात | संजय बनसोडे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण
02:22
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39

Latest news