राज्यात गुलाबी थंडीची चाहूल; पहाटेचा गारवा वाढला

मुंबई : राज्यात आता हळूहळू हिवाळ्याची चाहूल लागली असून, पहाटेच्या वेळी हवेत छान गारवा जाणवू लागला आहे. मात्र, दिवस जसजसा वर येतो, तसतसा उन्हाचा चटका आणि उकाडा देखील जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या राज्यातील तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पुढील काही दिवसात राज्यात कडाक्याची थंडी पडू शकते.

आज राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पण राज्यामध्ये अनेक भागांत दिवसाचे कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय सांताक्रूझ, अमरावती, डहाणू, सोलापूर, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा या भागांतही तापमान ३५ ते ३६ अंशांच्या पुढे गेले असून उन्हाचा जोर कायम आहे.

किमान तापमानात घट आणि गारवा
यातच राज्याच्या किमान तापमानात घट होत असली तरी अद्यापही गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. सध्या रात्रीच्या आणि पहाटेच्या किमान तापमानात घट होत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे पहाटेच्या वेळी आणि सकाळी हवेत हुळहुळी थंडी आणि छान गारवा अनुभवता येत आहे.

हवामानातील बदलाचे कारण
पुढील काही दिवस राज्यात तापमानाचा लपंडाव कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात दक्षिण केरळच्या किना-यालगत चक्राकार वा-यांची स्थिती तयार झाल्यामुळे हवामानात हे बदल होत आहेत. आज (ता. ८) देखील राज्यात असाच तापमानाचा लपंडाव आणि चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39

Latest news