पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास प्रकल्प

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. तब्बल ८२५ कोटी रुपये खर्च करून या बसस्थानकाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शिवाजीनगर बसस्थानक महाराष्ट्रातील सर्वांत मोठे आणि आधुनिक वाहतूक केंद्र ठरण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी झालेल्या बैठकीत या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नव्या बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये प्रशस्त प्रतीक्षागृह, बस उभ्या करण्यासाठी मोठी जागा, बस दुरुस्तीसाठी स्वतंत्र कार्यशाळा आणि व्यावसायिक वापरासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय प्रवाशांना आवश्यक असलेल्या इतर सुविधांचाही समावेश असेल. विशेष म्हणजे, या बसस्थानकातून वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवांना जोडण्याची योजना आहे. एसटी बस, पुणे मेट्रो, रेल्वे, पीएमपीएमएल बस आणि रिक्षा या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्यामुळे प्रवाशांना एका वाहनातून दुस-या वाहनात जाणे अधिक सोपे होणार आहे.

या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. पुढील तीन ते चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नव्या वाहतूक केंद्रातून दररोज एक लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. पुण्यासह खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईकडे जाणा-या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, शिवाजीनगरचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिवाजीनगर बसस्थानक त्याच जागेवर विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो, असे त्यांनी सांगितले. यासाठी परिवहन विभाग, एसटी महामंडळ आणि संबंधित अधिका-यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39

Latest news