सशस्त्र नक्षलवाद संपला, आता वैचारिक नक्षलवाद्यांशी मुकाबला

बस्तर : दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या रक्षणकर्त्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान मोदी छत्तीसगडमधील बस्तर येथे सीआरपीएफच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले. एकेकाळी नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या या भागात त्यांनी जवानांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. काही संघटनांवर वैचारिक नक्षलवाद्यांनी कब्जा केला असून ते देशाच्या संविधान आणि लोकशाहीविरोधात लोकांना भडकवत असल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ही पहिली दिवाळी आहे, जेव्हा देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादमुक्त झाला आहे आणि आपण जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहोत. याचे संपूर्ण श्रेय जवानांच्या बलिदानाला आणि समर्पणाला जाते, असेही त्यांनी सांगितले. क्षलवादाविरोधातील लढाईत सुरक्षादलांनी दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आपण त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत असल्याचे मोदी म्हणाले. मोदी पुढे म्हणाले, आमच्या सरकारने नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यांच्या आर्थिक रसद पुरवठ्यावर मोठा प्रहार करणारे निर्णय घेतले. सरकारच्या निर्णयांमुळे बनावट नोटांचे जाळे उद्ध्वस्त झाले आणि नक्षलवादी तसेच फुटीरतावाद्यांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली. गेल्या ४७ वर्षांत पहिल्यांदाच, मागील एका वर्षात कर्तव्य बजावताना सीआरपीएफच्या एकाही जवानाला प्राण गमवावे लागले नाहीत.

नक्षलवादाविरोधातील लढाई सोपी नव्हती, असेही पंतप्रधानांनी सांगितले. एकेकाळी देशातील जवळपास २० राज्यांमधील २३० हून अधिक जिल्हे नक्षलवादाच्या विळख्यात होते. संध्याकाळ झाली की जनजीवन ठप्प व्हायचे. लोकांना घराबाहेर पडणेही अशक्य व्हायचे. नागरिकांचा मतदानाचा अधिकारही नक्षलवाद्यांनी हिरावून घेतला होता. बिहार, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह देशाचा मोठा भाग डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाच्या प्रभावाखाली होता. हजारो गावे आणि कोट्यवधी लोकांना वर्षभरात दोन ते तीन हजार नक्षली हल्ल्यांचा सामना करावा लागत होता.

ही भूमी आपल्या वीरांच्या रक्ताने पावन
पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१० मध्ये याच परिसरातील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे ७६ जवान शहीद झाले होते. त्याच वर्षी दंतेवाडा येथे घडलेल्या आणखी एका घटनेत ४४ निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात आली होती. ही भूमी आपल्या वीरांच्या रक्ताने पावन झाली आहे. मात्र, महालांमध्ये राहणा-या कोणत्याही नामदाराच्या तोंडून दु:खाचा हुंकारही ऐकू आला नाही. त्यांच्या डोळ्यांतून एक अश्रूही आला नाही अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.

अनेक संघटनांवर वैचारिक नक्षलवाद्यांचा कब्जा
जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, नक्षली हिंसाचाराचा अंत झाला आहे. जंगलांमधील सशस्त्र नक्षलवादी संपले आहेत; मात्र वैचारिक नक्षलवाद्यांनी अनेक संघटनांवर कब्जा केला आहे. आजही ते देशाचे संविधान आणि लोकशाहीविरोधात लोकांना भडकवत आहेत. अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये वैचारिक नक्षलवाद्यांनी घुसखोरी केली आहे. आपल्याला त्यांना ओळखायचे आहे, त्यांचा पराभव करायचा आहे आणि देशाला सुरक्षित ठेवायचे आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33

Latest news