परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांच्या संकल्पनेतून तसेच युवा नेते रोहित पवार यांच्या दुष्काळ पाहणी दौ-यादरम्यान टाकळी कुंभकर्ण येथील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने आर्थिक व शैक्षणिक मदतीचे आश्वासन देण्यात आले होते.
या आश्वासनाची पूर्तता शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे करण्यात आली. यावेळी माजी आ. विजयराव गव्हाणे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासह दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
यात आरोही सामले, वेदिका सामले आणि अमृता सामले या ३ विद्यार्थिनींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी आ. विजयराव गव्हाणे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य, दिवाळी फराळ तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य आबासाहेब सामले, ज्येष्ठ नेते सदाशिवराव देशमुख, नागनाथराव बुलबुले, शालेय समितीचे अध्यक्ष अशोक सामले, अंकुश सामले, प्रकाश सामाले यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व नागरिकांचा सहभाग होता. या मदतीमुळे विद्यार्थिनींच्या चेह-यावर आनंद फुलला. विद्यार्थीनींनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
















