पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

बारामती : राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर, शरद पवार त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी गेले. तेथे शरद पवारांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. यापैकी सर्वांत महत्त्वाचा चेहरा होता तो म्हणजे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी (श. प.) पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही ‘सिल्व्हर ओक’वर उपस्थित होते. जुलै २०२३ मध्ये अजित पवार आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती.

या फुटीनंतर आता दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच ही भेट झाली आहे. ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यात ब्रीच कँडी रुग्णालयात भेट झाली होती. त्यांच्यातील संभाषणाचा एक व्हीडीओ समोर आला असून, त्यात दोघेही १० नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटून बोलूया असे शरद पवारांनी स्पष्ट केले. या संवादामुळे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याच्या चर्चांना गती मिळाली.

अजित पवार असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती – सुनील तटकरे
तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या एका विधानानेही या चर्चांना अधिक बळ दिले. ते म्हणाले, अजित पवार हयात असताना विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. २८ जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले नसते, तर १२ फेब्रुवारीलाच या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब झालं असतं, असा दावाही त्यांनी केला.

पटेल आणि तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी समोर येत आहेत. पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ व जय यांच्या अनुपस्थितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे पक्षाच्या कामकाजावर आणि पार्थ यांच्या वाढत्या प्रभावावर ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39

Latest news