लातूर : प्रतिनिधी
येथील जुन्या एमआयडीसीतील ‘एकमत’ भवनमधील ‘एकमत’ कार्यालयात विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन तथा ‘एकमत’च्या सर्वेसर्वा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ‘एकमत’ कार्यालयात श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. लक्ष्मीपूजनानंतर श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी ‘एकमत’च्या सर्व कर्मचा-यांचा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
















