फुलांच्या रांगोळीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

लातूर : प्रतिनिधी
सणांचा आनंद निसर्गाच्या सान्निध्यात आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतही साजरा करता येतो, याचा सुंदर प्रत्यय आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या अनोख्या दिवाळी पहाट उपक्रमातून आला. फाउंडेशनच्या अविरत कार्याचा आज २७१८ वा दिवस. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती विविध रंगांच्या फुलांच्या पाकळ्यांपासून आकर्षक आणि मनमोहक रांगोळी साकारत दिवाळी पहाट आगळयावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
या उपक्रमासाठी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी पहाटेपासूनच उत्साहाने आणि मेहनतीने सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, खुशी ग्रामच्या विद्यार्थ्यांनीही रांगोळीसाठी फुलांच्या पाकळ्या तयार करून देत या उपक्रमात मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांचा हा सहभाग उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. फुलांच्या पाकळ्यांतून साकारलेल्या या अनोख्या दिवाळी पहाट उपक्रमाचे लातूरकरांकडून कौतुक होत असून, सण साजरे करताना पर्यावरण संवर्धनाचा विचार किती सहजपणे रुजवता येतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे. यावेळी डॉ. पवन लड्डा यांनी सदर उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, प्रत्येक सण झाडांसोबत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होऊ शकतो. दिवाळीसारखा आनंदाचा सणही निसर्गाशी नाते जोडत आणि पर्यावरणाचे भान ठेवत साजरा करण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे. तसेच भविष्यात लातूर शहरातील हिरवळ जपण्यासाठी प्रत्येक लातूरकर यांनी आपले योगदान द्यावे, असे भावनिक आवाहन केले.
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नव्हे, तर समाजात सकारात्मक विचारांची आणि पर्यावरण संवर्धनाची ज्योत प्रज्वलित करणे होय. आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या या उपक्रमातून मिळालेली प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकाने घ्यावी आणि आपल्या परीने निसर्ग संवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, हाच या अनोख्या दिवाळी पहाटेचा खरा संदेश आहे असे मत अ‍ॅड. किरण चिंते मॅडम यांनी व्यक्त केले. डॉ. भास्कर बोरगावकर यांनी पहाटेपासून या उपक्रमासाठी परिश्रम घेणा-या सर्व सदस्यांचे व फुलांच्या रांगोळीसाठी पाकळ्या तयार करून देणा-या खुशी ग्रामच्या विद्यार्थ्यांचेही त्यांनी कौतुकपूर्वक आभार व्यक्त केले. त्यापूर्वी आमच ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन सदस्यांनी दिवाळीच्या पहाटे पासूनच शहारातील विविध भागातील झाडांना नऊ टँकरद्वारे पाणी दिले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47

Latest news