कनिष्ठ प्रशासन अधिकारी झाले सहाय्यक प्रशासन अधिकारी

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेतील लिपिकवर्गीय गट क संवर्गातील लिपिकवर्गीय कर्मचा-यांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने कनिष्ठ प्रशासन अधिकारी (एस १३) व सहाय्यक प्रशासन अधिकारी (एस १४) हे दोन संवर्ग एकत्रित करून सहाय्यक प्रशासन अधिकारी (एस १४) हा आता एकच संवर्ग केला आहे. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकारी (एस १३) यांची शासनाने दिवाळी गोड केली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २३ मे २०२२ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये, लिपिकवर्गीय कर्मचा-यांच्या मागण्यांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या समितीने गट-क मधील पदोन्नतीचे स्तर कमी करणेबाबत केलेल्या शिफारशीनुसार, गट-क मधील संवर्गाचा आढावा घेऊन संवर्ग कमी करण्याचे, पदोन्नतीचे स्तर कमी करण्याचे सूचित केले. तज्ञ समितीने ग्राम विकास विभागास शिफारशी सादर केल्या. त्यानुसार जिल्हा परिषद लिपिकवर्गीय गट-क संवर्गातील पदोन्नतीचे स्तर कमी करण्यासाठी ‘कनिष्ठ प्रशासन अधिकारी (एस १३)’ व ‘सहाय्यक प्रशासन अधिकारी (एस १४)’ हे दोन संवर्ग एकत्रित करुन ‘सहाय्यक प्रशासन अधिकारी (एस १४)’ हा एकच संवर्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू होत्या.
जिल्हा परिषदेतील लिपिकवर्गीय कर्मचा-यांची पदोन्नती साखळी सुधारित होत असल्याने शासन आदेश जारी झाल्यापासून सुधारित पदोन्नती साखळी नुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळणार आहेत. या दोन्ही पदांचे एकत्रीकरण झाल्याने सध्या असलेली सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन एकत्रित पदासाठी सेवा ज्येष्ठता यादी नियुक्त प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर तयार करावी, अशा सुचना आहेत. या दोन्ही संवर्गातील एकत्रीकरण झालेल्या सहाय्यक प्रशासन अधिकारी  पदावर कार्यरत असलेल्या अधिका-यांना मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडून जबाबदा-याचे वाटप होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47

Latest news