शेतकरी, मजूर कुटुंबांना फराळ, धान्याचे किट वाटप

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
दुष्काळामुळे शेती उद्ध्वस्त झाली, शेतक-यांच्या हाताला काम राहिले नाही आणि शेतमजूर कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात गरजूंच्या दिवाळीत गोडवा निर्माण करण्यासाठी संदीप नाईक प्रतिष्ठान (नवी मुंबई) यांच्या वतीने ‘मायेचा हात’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

याअंतर्गत आनंदवाडी येथील ६० दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना, तर आरीमोड येथील मसनजोगी वस्तीवरील ३० मजूर कुटुंबांना दिवाळी फराळ व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यंदा पावसाने दडी मारल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके करपल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात मजुरांच्या हाताला काम नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार हे किट वाटप करण्यात आले. यासाठी भाजप सरचिटणीस गणेश खरटमोल यांनी या मदतीच्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

आनंदवाडी येथे ६० शेतकरी कुटुंबांना तर आरीमोड येथील मसनजोगी वस्तीत ३० गरजू मजूर कुटुंबांना गोडतेल, विविध डाळी, अन्य जीवनावश्यक अन्नधान्य आणि दिवाळी फराळाचे किट देण्यात आले. विशेष म्हणजे, समाजातील वंचित आणि कष्टकरी घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. यावेळी ज्ञानोबा शेळके, भाजप सरचिटणीस गणेश खरटमोल, माजी सरपंच नागनाथ चलमले, सरपंच भागवत वंगे, हनुमंत परले, सुदर्शन धुळे, नारायण पवार, प्रल्हाद वेंजणे, माधव परले, विठ्ठल नाटकरे, अंकुश बोडके यांच्यासह परिसरातील तरुण, शेतकरी व मजूर उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47

Latest news