लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सहकार पॅनलकडून विजयी झालेले उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांची बाभळगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांनी निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेल्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील यशस्वी व जनहिताच्या वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीदरम्यान मारुती पांडे, शीलाताई पाटील, महेश धुळशेटे, आशिष पाटील राजूरकर, बाबुराव जाधव, मालुसरे ज्ञानोबा यांच्यासह सहकार पॅनलचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















