…तोपर्यंत पाकशी चर्चा अशक्य

शिकागो : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्यास नक्कीच वाव आहे; मात्र पाकिस्तानचा दहशतवादाला असलेला पाठिंबा हा दोन्ही देशांमधील संवादातील सर्वात मोठा अडथळा आहे, असे परखड मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. निष्पाप लोकांची हत्या सुरू असताना पाकिस्तानशी चर्चा करणे अशक्य असल्याचेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. बुधवारी शिकागो विद्यापीठात आयोजित एका संवाद सत्रात राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याचा व्हीडीओ शेअर केला आहे.

प्रसिद्ध अमेरिकन राज्यशास्त्रज्ञ प्राध्यापक रॉबर्ट पेप यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. यावेळी खुश नावाच्या पाकिस्तानी विद्यार्थ्याने भारत आणि पाकिस्तान आरोप-प्रत्यारोप सोडून परस्पर फायद्यासाठी एकत्र काम करू शकतात का? असा प्रश्न विचारला. यावर राहुल गांधी म्हणाले, एकत्र काम करण्यास वाव आहे, पण सर्वात मोठी समस्या पाकिस्तानकडून आपल्या देशात दहशतवादाला दिले जाणारे प्रोत्साहन आणि पाठिंबा ही आहे. आपल्या निष्पाप लोकांची हत्या होत असताना पाकिस्तानशी संवाद साधणे आम्हाला स्वीकार्य नाही, असे राहुल गांधी ठामपणे म्हणाले.

निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यास लोकशाही संपेल
निवडणूक व्यवस्थेत काही त्रुटी आहेत म्हणून निवडणुकांवर बहिष्कार घालणे शहाणपणाचे नाही. तसे पाऊल उचलल्यास त्या क्षणाला लोकशाहीचा अंत होईल. काँग्रेस पक्षाचा तसा कोणताही विचार नाही असे स्पष्ट मत राहुल गांधी यांनी मांडले. तसेच व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे याची लोकांना जाणीव होईपर्यंत आम्ही संघर्ष आणि टीका सहन करण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ

कोलकाता : बंगालच्या उपसागरामध्ये आणखी एक चक्रीवादळ निर्माण झाले...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution issue|लातूरच्या पूर्व भागात वायुप्रदूषणाचा विळखा! टायर जाळल्याने विषारी धूर
02:24
Video thumbnail
Impact|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम! लातूरमध्ये फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीला सुरुवात
04:27
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये ग्रामसेवकाच्या घरात १५ लाखांची चोरी; गेट कापून चोरट्यांचा प्रवेश
02:35
Video thumbnail
DCM Sunetra Pawar|नांदेडमध्ये दुष्काळाचा आढावा; सुनेत्रा पवारांचे मोठे निर्देश
07:19
Video thumbnail
Latur News|प्रेम,विरह अन् स्त्रीच्या वेदना! 'पगला घोडा' नाटकाने प्रेक्षकांना केले अंतर्मुख
07:55
Video thumbnail
Purna|हाजी भाई कुरेशी यांचा वाढदिवस पूर्णा शहरात जल्लोषात
05:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
01:17
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धीरज देशमुखांचा पाच मुद्द्यांवर मोठा खुलासा!लातूर निवडणूक,सोनिया गांधी पुस्तक,जरांगे
07:14
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये १२ तासांचे भजन आंदोलन स्थगित! बी झोन कार्यालयात रात्री उशिरा बैठक
02:02
Video thumbnail
Latur City Bus|लातूरची सिटी बस सेवा बंद! १८ बसेस जाग्यावर, नागरिकांना आर्थिक भुर्दंड
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सफाई कामगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय सफाई आयोग आक्रमक
04:18
Video thumbnail
Latur News | सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या विटंबनेविरोधात काँग्रेसचे आंदोलन; मडकी फोडून निषेध
02:25
Video thumbnail
Himayatnagar News | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टची ११ लाखांची मदत
02:16
Video thumbnail
Nanded News | अशोक चव्हाणांसह चार आमदारांना धमकी देत खंडणीची मागणी; आरोपी मुंबईतून अटकेत
03:59
Video thumbnail
Latur Crime News | कोऱ्या बॉण्डपेपरवर सह्या घेऊन घर हडपल्याचा आरोप; महिला सावकाराविरोधात गुन्हा
02:16

Latest news