नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील राफेल लढाऊ विमानांची संख्या ३५ वरून ३२ झाल्याचा दावा ब्रिटिश विमानविषयक नियतकालिकाच्या अहवालातून करण्यात आला आहे. मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लष्करी संघर्षापूर्वी भारतीय हवाई दलाकडे ३५ राफेल विमाने होती. मात्र, आता यापैकी केवळ ३२ विमाने सेवेत असल्याचे फ्लाईट इंटरनॅशनल या नियतकालिकाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संघर्षादरम्यान भारताची राफेल विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पुन्हा चर्चेत आला आहे.
फ्लाईट इंटरनॅशनल ने प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड एअर फोर्सेसच्या वार्षिक निर्देशिकेत भारतीय हवाई दलाच्या सक्रिय ताफ्यात ३२ राफेल विमानांची नोंद करण्यात आली आहे. पाकिस्तानने मे २०२५ मधील संघर्षादरम्यान हिंदुस्थानी हवाई दलाची अनेक लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. या नव्या आकडेवारीमुळे पाकिस्तानच्या दाव्याला बळ मिळाल्याचे शफाकना म्हटले आहे.
















