जिंतुर: जिंतूर नगर परीषदमधील प्रलंबित सेवानिवृत्तीची रक्कम व आर्थिक लाभ तात्काळ देण्याची मागणीसाठी गुरुवार, दि. १९ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू करण्यात आले.
जिंतूर नगरपरिषदेतील सेवानिवृत्त सफाई कामगारांची सेवानिवृत्तीनंतरची प्रलंबित रक्कम तसेच इतर आर्थिक लाभ अद्याप मिळाले नसल्याने संबंधित कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
निवेदनात स्वच्छता कामगारांनी नमूद केले आहे की, त्यांनी अनेक वर्षे नगरपरिषदेत प्रामाणिकपणे सेवा बजावून शहराची स्वच्छता राखण्याचे व इतर काम केले. मात्र सेवानिवृत्त होऊन बराच कालावधी लोटला तरी त्यांना हक्काची सेवानिवृत्तीची रक्कम व इतर देय आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी स्वरूपात मागणी करण्यात आली; मात्र अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त स्वच्छता कामगार श्री उत्तमराव गंगाधर मोहीते व अश्रोबा दाजीबा ससे हे न.प. कार्यालयाच्या समोर अमरण उपोषणास बसले आहेत. त्याच प्रमाणे जिंतूर नगरपरिषद मधील अनेक वर्ग ३ व वर्ग ४ चे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे परंतु त्यांना आज पावेतो सेवा उपदान व रजा रोखीकरणाचे पैसे मिळालेले नाही तर काही कर्मचारी स्वर्ग वास झाले तरीपण त्याच्या रक्कमा आज पावेतो न.प. कडे बाकी आहे.
















