22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रड्रग्ज प्रकरणाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का?

ड्रग्ज प्रकरणाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का?

मुंबई : युट्यूबर एल्विश यादव हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणावरून राज्यसभा खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एक खासदार या तस्करांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो. त्यांना मिठ्या मारल्या जातात आणि त्यांच्या हातून गणपतीची आरती केली जाते. मुख्यमंत्री त्याच्या बाजूला उभे राहतात. देशात जो खतरनाक अमली पदार्थाचा व्यापार चालवतात, त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचे उत्तर देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा लागेल. रेव पार्टीमध्ये सापाचे विषापासून तयार होणारा अमली पदार्थ सेवन करणारे वर्षावर पोहोचतात आणि त्यांचे नाव तुम्हाला माहित आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती नाही? असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांपर्यंत याला कोणी पोहोचविले. मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील हे खासदार कोण आहेत? त्याचे काय आर्थिक संबंध आहेत मुख्यमंत्र्यांच्या टोळीत कोणाशी आहेत. याचे उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांना द्यावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीही बोलू नये. मी तोंड उघडले की तुमची तोंड बंद पडतील, हा त्यांचा नेहमीचा डायलॉग आहे. पण मी तर म्हणतो, आधी तुम्ही तुमचे तोंड उघडा मग बघू काय ते, असे राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR