40.2 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

नाशिक : कांद्याच्या दरात मागील आठ दिवसांपासून रोज घसरण होत आहे. आशिया खंडात लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात दररोज घसरण आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. २७ ऑक्टोबर रोजी उन्हाळी कांद्याला सर्वोच्च दर मिळाला होता. त्या दिवशी कांद्याचा सरासरी दर ४ हजार ९०० रुपये इतका होता. सरकारने कांदा दर नियंत्रण करण्यासाठी नाफेडचे कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि आठवड्याभरात कांद्याच्या दरात तब्बल १२५० रुपयांची घसरण झाली.

देशाच्या पाच राज्यात विधानसभा निवडणूक होत आहेत. यामुळे केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉक विक्रीसाठी बाजारात आणण्यात आला आहे. हा कांदा पंचवीस रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. सुमारे दोन लाख मॅट्रिक टन कांद्याचे वाटप सुरू झाले. यामुळे आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये दररोज घसरण होत आहे. कांद्याचे पाच हजार रुपयांच्या जवळपास गेलेले दर ३७०० रुपयांपर्यंत खाली आले आहे. नाशिकमधील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १२५० रुपयांची घसरण झाली आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा
केंद्र सरकारने स्वस्तात कांदा विक्रीचा प्रयोग न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. कांद्याचे निर्यात शुल्क ८०० डॉलर प्रति टन केले. यामुळेही कांदा विदेशात जाण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे देशातंर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर घसरले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR