17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयऑनलाइन सट्टेबाजी अ‍ॅप बेकायदेशीर नाही

ऑनलाइन सट्टेबाजी अ‍ॅप बेकायदेशीर नाही

सरकार २८% जीएसटी घेते काँग्रेसचा भाजपावर पलटवार

रायपूर : छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळ्यावरून राजकारण पेटले आहे. काल ईडीच्या कारवाईमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव समोर आल्याने भाजप आक्रमक झाली आहे. शनिवारी भाजपाने छत्तीसगड सरकारच्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर काँग्रसनेही भाजपावर पलटवार केला आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, संचार विभाग प्रमुख जयराम रमेश, राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी क्रमबद्धपणे भाजपाने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

जयराम रमेश म्हणाले की, हे सुडबुद्धीचे राजकारण आहे. हा अधिकारांचा उघड दुरुपयोग आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे अशा कारवाया केल्या जात आहेत. छत्तीसगडमधील विद्यमान सरकारवर जनतेचा विश्वास कायम आहे आणि काँग्रेसचे सरकारच पुन्हा सत्तेत येणार आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये ईडीचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग केला जात आहे.

जयराम रमेश म्हणाले की, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणामध्ये मार्च २०२२ पासून छत्तीसगड सरकार कारवाई करत आहे. ओडिशा, दिल्ली, मध्य प्रदेशमध्ये छापे मारले जात आहेत. मात्र राज्य सरकार दुबईमध्ये छापे मारू शकत नाही. केंद्र सरकारने याबाबत कारवाई केली पाहिजे. मात्र त्यांनी याबाबत काहीही केलेले नाही. जयराम रमेश पुढे म्हणाले की, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपला केंद्र सरकारने कायदेशीर दर्जा दिलेला आहे. तसेच या अ‍ॅपवर २८ टक्के जीएसटीसुद्धा लागू केलेला आहे. याला कायदेशीर दर्जा दिलेला आहे, ते बेकायदेशीर नाहीत.

जयराम रमेश यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या योजनांची रेवडी म्हणत खिल्ली उडवायचे. मात्र काल भाजपाने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, तो केवळ कॉपी करून तयार केलेला जाहीरनामा आहे. धान खरेदीपासून ते सिलिंडरपर्यंत आमच्या घोषणांची कॉपी करण्यात आलेली आहे. जेव्हा आम्ही कर्नाटकमध्ये गॅरंटी दिली तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली. आता म्हणताहेत की छत्तीसगडमध्ये मोदींची गॅरंटी असेल. हे सर्व काय दाखवत आहे असा टोला त्यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR