नवी दिल्ली : एफआरपीसह विविध मागण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरुच आहे. शेतक-यांनी चलो दिल्लीची घोषणा करत दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सिंधू आणि टिकरी या सीमा बंद केल्या होत्या. रस्ता सुरु करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, आता दिल्ली पोलिसांनी सिंधू आणि टिकरी बॉर्डर अंशत: सुरु करण्याचा दिल्ली निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना वाहतुकीपासून दिलासा मिळाला आहे. शेतकरी आंदोलकांनी २९ फेब्रुवारीला होणारा दिल्ली चलो मार्च स्थगित केला आहे. यानंतर पोलिसांनी सिंधू आणि टिकरी बॉर्डर काही प्रमाणात खुली करत नागरिकांना दिलासा दिला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरची प्रत्येकी एक सर्व्हिस लेन वाहनांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. शेतक-यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली हरियाणाची सिंधूू बॉर्डर बंद केली होती. शेतक-यांचा दिल्ली चलो मोर्चा पुढे ढकलण्याच्या घोषणेनंतर दिल्ली पोलिसांनी सीमा अंशत: खुली करण्यात आली आहे. शेतक-यांना अडवण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांनी या सीमेवर दुभाजक बसवले होते. याशिवाय दगड आणि सिमेंटचा भक्कम भिंतीही बांधण्यात आल्या होत्या. शनिवारी पोलिसांनी जेसीबी मशीनच्या साह्याने हा अडथळा तोडून क्रेनच्या सहाय्याने दुभाजक हटवले. त्यामुळे हरियाणाहून राजधानीकडे जाण्याचा मार्ग अंशत: खुला झाला आहे.