40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeउद्योगबंशीधर टोबॅको कंपनीवर ५ राज्यांत छापे

बंशीधर टोबॅको कंपनीवर ५ राज्यांत छापे

मुंबई : गेल्या १५ तासांपासून प्राप्तीकर विभागातील अधिका-यांची छापेमारी ही विविध राज्यांमध्ये सुरू आहे. आयटीकडून ही छापेमारी एका कंपनीच्या विरोधात सुरू आहे. विशेष म्हणजे मोठे घबाड आयटीच्या हाती लागल्याचे बघायला मिळते. अजूनही ही छापेमारी सुरूच आहे. थेट तंबाखू बनवणा-या कंपनीच्या विरोधात ही छापेमारी सुरू आहे. आयकर विभागाच्या १५ ते २० टीम या पाच राज्यांमध्ये छापेमारी करत आहेत. कानपूरसह चार राज्यांमध्ये ही छापेमारी सुरू आहे.

बंशीधर टोबॅकोवर आयकर विभागाकडून ही कारवाई केली जात आहे. नयागंज येथील बंशीधर एक्सपोर्ट अधिकारी कारवाई करत आहेत. बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक के.के. मिश्रा यांच्या दिल्लीतील घरी देखील आयकर विभागाचे अधिकारी पोहचले. तिथे अधिका-यांना मोठे घबाड सापडल्याचे बघायला मिळते.

बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक के.के. मिश्रा यांच्या घरी ५० कोटींहून अधिक किंमतीच्या कार मिळाल्या आहेत. या कारमध्ये अत्यंत महागड्याही काही गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये १६ कोटी रुपयांच्या रोल्स रॉइस फँटमचा देखील समावेश आहे. ही एक अत्यंत महागडी गाडी आहे.

रिपोर्टनुसार, तंबाखू कंपनीतून आतापर्यंत साधारणपणे ४ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. फक्त हेच नाही तर यासोबतच रोल्स रॉयस फँटम, फरारी, मॅक्लारेन, लॅम्बोर्गिनी यासारख्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. फक्त कानपूर आणि दिल्लीच नाही तर अनेक राज्यांमध्येही छापेमारी सुरू आहे.

आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्येही दिल्ली आयकर विभागाकडून छापेमारी ही केली जात आहे. रिपोर्टनुसार, कंपनीची उलाढाल ही २० ते २५ कोटी दाखवण्यात आली. परंतू प्रत्यक्षात कंपनीची उलाढाल ही तब्बल १०० ते १५० कोटी रुपये आहे. यामुळेच आयकर विभागाकडून ही मोठी छापेमारी सुरू करण्यात आली. टॅक्स फाइल प्रकरणातूनच ही छापेमारी सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR