33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeउद्योगनारायण मूर्तींनी नातवाला गिफ्ट दिले २४० कोटींचे शेअर्स

नारायण मूर्तींनी नातवाला गिफ्ट दिले २४० कोटींचे शेअर्स

नवी दिल्ली : प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आपल्या चार महिन्यांच्या नातवाला १५ लाख शेअर गिफ्ट दिले आहेत. त्याची किंमत २४० कोटी रुपये आहे. हे शेअर कंपनीत ०.०४% आहे. हे शेअर गिफ्ट केल्यानंतर इन्फोसिसमध्ये नारायण मूर्ती यांची भागिदारी ०.४०% वरुन ०.३६% राहिली आहे.

नारायण मूर्ती यांना १० नोव्हेंबर रोजी नातू झाला. नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन आणि अपर्णा आई-बाबा झाले. नारायण मूर्ती यांनी नातवाचे नाव संस्कृत शब्द अतूटपासून प्रेरित होऊन ठेवले. त्यांनी नातवाचे नाव एकाग्र ठेवले.

एकाग्र यांच्यापूर्वी नारायण मूर्ती आजोबा बनले. त्यांची मुलगी अक्षता आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत. त्यांची नावे कृष्णा सुनक आणि अनुष्का सुनक आहेत. ऋषी सूनक काही महिन्यांपूर्वी सहकुटूंब भारत दौ-यावर आले होते. तसेच नारायण मूर्ती यांची पत्नी सुधा मूर्ती यांची आंतरराष्ट्रीय महिला दिनी खासदार म्हणून नियुक्त केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR