35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसंभाजीनगरमधील खैरे-दानवे वाद अखेर संपला

संभाजीनगरमधील खैरे-दानवे वाद अखेर संपला

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीत माझे नाव असणे किंवा नसणे महत्त्वाचे नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम मी करणार असल्याची भूमिका अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपण ठाकरेंची शिवसेना सोडणार नसल्याचे देखील अंबादास दानवे म्हणाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी खैरे आणि दानवे इच्छुक आहेत. तर, खैरे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दानवे यांनी देखील उमेदवारीवर दावा केला होता. तसेच दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका देखील केली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी थेट पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न झाले. मात्र, आता दानवे यांनी एक पाऊल मागे घेतले असून, पक्षाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खैरे-दानवे वाद संपला असल्याची चर्चा आहे.

चंद्रकांत खैरे आणि दानवे यांच्यातील वाद समोर आल्यावर दानवे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान यावर बोलताना दानवे म्हणाले की, ‘‘ते म्हणत असतील येणार, मात्र मी जाणार नाही. मी उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. मी सुस्पष्टपणे सांगत आहे. जे म्हणतात जाणार, याबाबत त्यांनाच विचारणा करा. त्यांना उमेदवार मिळत नसून, हे त्यांचे अपयश आहे. विशेष म्हणजे भाजपची ही हार आहे, असेही दानवे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR