नवी दिल्ली : भारतीय वायुदल आता आपल्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात परदेशात निर्मिती जेट समाविष्ट करणार नाही. हा मोठा निर्णय वायुदलाने सामरिक स्वावलंबन व आत्मनिर्भरतेसाठी घेतला आहे. वायुदलाच्या सूत्रांनी सांगितले की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अनेकदा आत्मनिर्भरतेबाबत वायुदलास आग्रह केला आहे. हे लक्षात घेता आगामी काळात भारतातच निर्मित स्वदेशी लढाऊ विमानांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वायुदल सध्या ११४ लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, या विमानांची निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून भारतातच केली जाईल. या करारात ‘अनिवार्यता की स्वीकार्यता’ म्हणजे एक्सपेन्टन्स ऑफ नेसेसिटीवर (एओएन) संरक्षण मंत्रालयावर शिक्कामोर्तब केले आहे. वायुदलाचा निर्णय पाहता आता एओएन मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे. नौदलाने स्वदेशी जेट्सचा वापर करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यांच्या युद्धनौकांचीही भारतातच निर्मिती केली जाईल.
वायुदलात स्वदेशीकरणाचे फायदे
भारतात निर्मित फायटर जेट्सचा वापर केल्यामुळे यासाठी आवश्यक औद्योगिक इकोसिस्टिम तयार होईल. वायुदलास देखभाल-दुरुस्ती व निर्मितीसाठी बाहेरील देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. भारताची सामरिक स्वायत्तता बळकट होईल. म्हणजेच सामरिक निर्णय घेण्यामध्ये अधिक स्वातंर्त्य असेल. स्वदेशी मिलिट्री जेट निर्मितीचा आधार बळकट होईल. ही संरचना स्वदेशी विमानांच्या कामी येईल. वायुदलात स्वदेशीकरणाच्या निर्णयामुळे हाय एंड तंत्रज्ञान मिळू शकेल. रोजगाराच्या नव्या संधीदेखील निर्माण होतील.
वर्षाला २४ विमानांची निर्मिती क्षमता
गत आठवड्यात मिग-२१ चे दोन स्क्वॉड्रन सेवेतून बाहेर झाले. नंतर ताफ्यात एलसीए मार्क-२ च्या ९७ जेट्सचा समावेश निश्चित केला. या निर्णयाने वायुदल आत्मनिर्भरतेच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळतात. हिंदुस्तान एअरोनॉटिकल लिमिटेड (एचएएल) ही ऑर्डर लवकर पूर्ण करण्यासाठी नागपुरात वर्षाला २४ विमानांची निर्मिती करण्याची क्षमता वाढवत आहे. शिवाय राफेलच्या २ स्क्वॉॅड्रनच्या करारानंतर वायुदलाने भारतातच निर्मित लढाऊ विमाने उडवण्याचा निर्णय घेतला आहे. वायुदलाने ४८ हजार कोटींच्या करारांतर्गत ८३ तेजस मार्क-१ ची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.