मुंबई : विराट कोहलीने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आपले ५० वे वनडे शतक झळकावून इतिहास रचला. वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्याने हा भीम पराक्रम केला. यासह त्याने सचिन तेंडुलकरला (४९ वनडे शतक) मागे टाकून नवा विक्रम आपल्या नावावर केला. शतक झळकावल्यानंतर मैदानात उभा राहून विराटने सचिन सचिन तेंडुलकरला अभिवादन केले.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके झळकावणारे खेळाडू
५० : विराट कोहली
४९ : सचिन तेंडुलकर
३१ : रोहित शर्मा
३० : रिकी पाँटिंग
२८ : सनथ जयसूर्या
याशिवाय, कोहलीने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वचषकातील मोठा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. याबाबतीत त्याने सचिन तेंडुलकर (६७३), मॅथ्यू हेडन (६५९) आणि रोहित शर्मा यांना एकादमात मागे टाकले.
कोहलीच्या या विक्रमानंतर, देशातील अनेक नेत्यांनी त्याच्यावर सुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Today, @imVkohli has not just scored his 50th ODI century but has also exemplified the spirit of excellence and perseverance that defines the best of sportsmanship.
This remarkable milestone is a testament to his enduring dedication and exceptional talent.
I extend heartfelt… pic.twitter.com/MZKuQsjgsR
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2023
Enter into the final like a Boss.
What an electrifying display of cricketing prowess. All the best for the showdown.
Let's get the cup. #INDvsNZ pic.twitter.com/aYueVQsu3H
— Amit Shah (@AmitShah) November 15, 2023
Many congratulations to #TeamIndia for entering the finals of the Cricket World Cup!
We are now one step closer to the coveted trophy! 🇮🇳
Every Indian is filled with utmost joy and immense pride by the stupendous performance of the entire team, especially @imVkohli’s brilliant… pic.twitter.com/muXA2TiVVQ
— Mallikarjun Kharge (@kharge) November 15, 2023
भारतीय क्रिकेट संघातील फलंदाजीचा कणा असलेल्या #विराट_कोहली ने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांतील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडत ५० वे विक्रमी शतक आज वानखेडेवर झळकावले.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत साजरा झालेला विराट कोहलीचा शतकांच्या अर्धशतकांचा… pic.twitter.com/KfwmGNzDFI
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 15, 2023