39.5 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeक्रीडाभारतीय संघाची वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक

भारतीय संघाची वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक

मुंबई : भारतीय संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड संघावर ७० धावांनी विजय मिळवून वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी १९८३, २००३ आणि २०११ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

भारताने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताकडून कॅप्टन रोहित शर्मा याने ४७ धावा केल्या. शुबमन गिल याने नाबाद ८० धावा केल्या. शुभमनला क्रॅममुळे मैदान सोडावं लागलं. त्यानंतर शुबमन गिल शेवटच्या काही षटकांसाठी मैदानात आला आणि त्याने काही धावा जोडल्या. विराट कोहली याने ११३ बॉलमध्ये ११७ धावा केल्या. मुंबईकर लोकल बॉय श्रेयस अय्यर याने १०५ धावांची शतकी खेळी केली. विकेटकीपर केएल राहुलने ३९ धावांची नाबाद खेळी केली. तर सूर्यकुमार यादव १ रनवर आऊट झाला.

३९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये ४६ धावा करताना संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. रचिन रवींद्र आणि डेव्हन कॉनवे प्रत्येकी १३ धावा करून बाद झाले. पॉवरप्लेच्या सुरुवातीच्या षटकात किवी सलामीवीरांनी सावधपणे शॉट्स खेळले. ५ षटकांत संघाची धावसंख्या बिनबाद ३० धावा होती. येथे मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर यश संपादन केले आणि कॉनवेला बाद केले. एवढेच नाही तर शमीने रचिन रवींद्रला ८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. त्यानंतर केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेल यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाली.

या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. मिचेल आणि केन या दोघांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. रोहितने ही जोडी फोडण्याची जबाबदारी शमीवर टाकली. शमीनेही संघाला नाराज केले नाही आणि आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. शमीने एकाच षटकात दोन विकेट्स मिळवल्या. शमीने प्रथम केनला (६९) बाद केले. त्यानंतर शमीने टॉल लॅथमची शिकार केली. त्यानंतर मिचेल आणि फिलिप्स यांनी काहीकाळ झुंज दिली पण त्यांना त्यात अपयश आले. काही अंतरांनी विकेट पदत गेल्या. आणि अखेर किवी संघ ऑलआऊट झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR