38.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeनांदेडनांदेड लोकसभेसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.४२ टक्‍के मतदान

नांदेड लोकसभेसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.४२ टक्‍के मतदान

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आज २६ एप्रिल रोजी मतदान सकाळी ७ वाजेपासून सुरु झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.४२ टक्‍के मतदान झाले आहे. १६ नांदेड लोकसभा मतदार संघात शहरी व ग्रामीण भागात सकाळपासून मतदान उत्‍साहात सुरु आहे. दुपारीही मतदान केंद्रावर मतदारांच्‍या रांगा दिसून येत आहेत.

तरूण मतदारांसह महिला, पुरूष,जेष्ठ, दिव्यांग आणि तृतियपंथी मतदर लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी झाले आहेत. देगलूर मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यत सर्वाधिक ४६.३० टक्‍के मतदान झाले आहे. तर भोकर ४३.८५ टक्‍के, नांदेड उत्‍तर ४१.६९ टक्‍के, नांदेड दक्षिण ४४.३५ तर नायगाव ४०.७९ आणि देगलूर ४६.३० टक्‍के, मुखेड ३७.५५ टक्‍के असे एकूण ४२.४२ टक्‍के मतदान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR