28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिक येथे निवडणूक निर्णय अधिका-यांकडून अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप

नाशिक येथे निवडणूक निर्णय अधिका-यांकडून अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी माघारीनंतर शिल्लक उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षांचे चिन्ह निवडणूक आयोगाने ठरवून दिले आहे. याव्यतिरिक्त अपक्ष व मान्यता नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिका-यांनी चिन्ह बहाल केले.

चिन्हवाटपात कुणाला फुगा, तर कोणाला शिट्टी मिळाली. याशिवाय प्रेशर कुकर, टेबल, ट्रक, जहाज, ट्रे, तुतारी, सोफा अशी विविध चिन्हे उमेदवारांना बहाल करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ६) दुपारी तीननंतर चिन्हवाटप झाले. नाशिकच्या उमेदवारांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी, तर दिंडोरीच्या उमेदवारांना अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी चिन्ह बहाल केले.

नाशिकमध्ये गॅस शेगडीसाठी तीन उमेदवारांचा अट्टाहास होता. एकापेक्षा अधिक उमेदवारांनी मागणी केल्यामुळे त्यांची सोडत काढण्यात आली. यात वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांना ‘लॉटरी’ लागली. तर शांतिगिरी महाराजांना बादली, सिद्धेश्­वरानंद सरस्वती यांना संगणक, जितेंद्र भाभेंना बॅट हे चिन्ह मिळाले. कांतिलाल जाधव यांना कोट, ‘आप’चे कैलास चव्हाण यांना किटली हे चिन्ह मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR