36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रदत्ता भरणे यांची शिवीगाळ ; मतदार संतापले

दत्ता भरणे यांची शिवीगाळ ; मतदार संतापले

इंदापूर : सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. हा व्हीडीओ इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा असून सध्या हा व्हीडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

या व्हायरल होणा-या व्हीडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे मतदान केंद्रावर एका व्यक्तीशी भांडत असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रय भरणे हे पवार गटाचे काम करणा-या व्यक्तीला शिवीगाळ देखील करत असल्याचे या व्हीडीओमध्ये दिसत आहे. तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही. मलाच तुमच्या मदतीला यावं लागेल, असे वक्तव्य दत्तात्रय भरणे या व्हीडीओमध्ये करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR