अमरावती : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी उमेदवारांना निवडणूक आयोगाने आखून दिल्यानुसार खर्च सादर करावयाचा होता. मात्र उमेदवारांनी दिलेला खर्च जुळून येत नसल्याने अमरावती लोकसभा मतदार संघातील नवनीत राणा यांच्यासह बळवंत वानखेडे व दिनेश बुब यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा यावर्षी २५ लाखाने वाढवून ती ९५ लाख केली होती. त्यानुसार त्याचा दैनंदिन खर्चाचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिका-यांकडे सादर करण्याच्या सूचना सर्व उमेदवारांना दिल्या होत्या.
त्यानुसार उमेदवारांच्या खर्चाच्या सॅडो रजिस्टरनुसार खर्च जुळत नसल्याने अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे व प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना नोटीस बजावल्या आहे.