27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमालेगावच्या माजी महापौरांवर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

मालेगावच्या माजी महापौरांवर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

नाशिक : रविवारी मध्यरात्री मोटरसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी मालेगावचे माजी महापौर तसेच एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार केला. ईसा यांच्यावर हल्लेखोरांनी एकुण तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अब्दुल मलिक युनूस ईसा मध्यरात्री १ ते दीडच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले असतामोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. झाडलेल्या तिन्ही गोळ्या ईसा यांना लागल्या असून, एक गोळी हाताला, एक पायाला तर एक छातीत लागली आहे. यानंतर त्यांच्यासोबत असणा-या सहका-यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान या हल्ल्यानंतर मालेगावमध्ये चांगलीच खळबळ उडाली असूनख नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. शिवाय शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून,पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी हल्लेखोरांना तातडीने पकडून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR