बोरी : सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बोरीसह परीसरातील गावातील नागरिकांच्या वतीने बोरी ते जिंतूर तहसील कार्यालय पायी मोर्चा बुधवार दि. २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात बोरी पोलिसांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी बोरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक कदम, शेख रफिक, जमादार कांदे उपस्थित होते.
सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बोरीसह परीसरातील गावातील हजारो युवक, पुरुष व महिलांच्या उपस्थितीत बोरी येथील जिजाऊ चौक येथून जिंतूर तहसिल कार्यालय पर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर जिंतूर येथे तहसीलदार यांना आरक्षण मागणीसाठी निवेदन देण्यात येणार आहे. सदरील निवेदनात मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करणा-या विरोधात कार्यवाही करावी. हिंगोलीच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांना धमकी देणा-यांना पुढील सभेत बंदी घालावी व गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणी संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने बोरी ते जिंतूर तहसील कार्यालय पायी दिंडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.