लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनूसार विलासराव देशमुख युवा मंच लातूर शहरच्या वतीने शहरात युवा संवाद अभियान सुरु करण्यात आले. विलासराव देशमुख युवा मंच लातूर शहर जिल्हाध्यक्ष विजय टाकेकर यांच्या पुढाकारातून युवा संवाद अभियानची सुरुवात येथील प्रभाग क्रमांक १०, शामनगरमधून करण्यात आली.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी महापौर अॅड. दीपक सुळ, माजी नगरसेवक युनूस मोमीन यांच्या हस्ते या अभियानचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास प्रभाग १० चे समन्वयक बालाजी मुस्कावाड, विष्णुदास धायगुडे, अकबर माडजे, रत्नदीप अजनीकर, पृथ्वी पवार, शैलेश भोसले, महेश शिंदे, संजय क्षीरसागर, प्रतिक मुळे, व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.