लातूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर काँगे्रस महाविकास आघाडीने लोकसेवेची पंचसुत्री जाहीर केली आहे. या पंचसुत्रीतील महालक्ष्मी योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बणविणारी आहे. परंतू, विरोधी पक्षाकडून खोट्या आश्वासनाच्या माध्यमातून दिशाभूल केली जात आहे. समस्त महिलांनी आपली दिशाभूल करुन न घेता लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ शहरातील हणुमंतवाडी येथे दि. १७ नोव्हेबर रोजी आयोजित महिला मंळाव्यात श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, सुनिताताई अरळीकर, अॅड. जयश्रीताई पाटील, आशाताई भिसे, सुनिताताई चाळक, पुजाताई पंचाक्षरी, डॉ. फरजानाताई बागवान, जयश्रीताई चिंताले, शितलताई मोरे, विद्याताई पाटील, ख्वॉजाबाणु अन्सारी, लताताई मुद्दे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणा-या, विकासरत्न विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा चौफेर विकास केला. त्यासोबतच लातूरचाही सर्वांगीण विकास केला. हे आपण सर्वजण जाणतो. त्यांच्या कामाचा वारसा माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि आमदार धिरज देशमुख पुढे चालवत आहेत. अमित देशमुख यांनी लातूरच्या जनतेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. महायुतीचे सरकार हे स्थगिती सरकार आहे. भ्रष्टाचा-यांचे, लुटारुंचे सरकार आहे. जमेल तेथे भ्रष्टाचार करण्यात महायुतीचे मंत्री गुंतल्याने राज्यातील कायदा व सुव्यस्थेला धोका निर्माण झाला आहे. महागाई, बेकारी वाढली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे महायुतीला आता हद्दपार करण्याची वेळ आली असून २० नोव्हेंबर रोजी अमित देशमुख यांच्या नावापुढील हाताच्या चिन्हा समोरील बटन दाबून अमित देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी अर्चना इरलेवाड, नफिसा शेख, शकुंतला घोडके, सुरेखा हंगरगे, रेणूका शेंद्रे, जना घंटे, लता कदम, नुरा शेख, अपर्णा काबंळे, शांताबाई काबंळे, संध्या जाधव, शांताबाई गुराळे, कमल तिवारी, राही तुलसुरे, सुजाता घंटे, भोसलेताई, जिजाबाई घंटे, शोभाताई घंटे, नंदा भोसले, रमाबाई कांबळे, रोहिनी काबंळे, संजना काबंळे, किरण काबंळे, आफसाना सय्यद, मिनाषी पवार, कल्पना पवार, सुमित्रा पवार, सुनिता जाधव, सुनिता कैले, विमलबाई पवार, लता देवनुरे, मंगल देवनुरे, अर्चना खमामे, बबिता काबंळे, सिमा काबंळे, लता काबंळे, अयोध्या गोडबोले, नंदा पालके, रेश्मा सवई, आज्ञान काबंळे, सोनाली काबंळे, वर्षा काबंळे तसेच अशोक गोविंदपूरकर, राजकुमार पिटले, सिकंदर पटेल, लक्ष्मीनारायन नावंदर, बसवंतआप्पा भरडे, प्रा. शिवाजी शिंदे, लक्ष्मण काबंळे, नामदेव इंगे, गोविंद सुरवसे, विनोद वाकडे, अविनाश बट्टेवार, गिरीष ब्याळे, धनराज गायकवाड, ऋषी पाटील, गोविंद ठाकुर, पवन लांडगे यांच्यासह आदि महिला व कॉग्रेस पक्षाचे कार्यकते व आयोजक मंडळींची उपस्थिती होती.