मोहोळ : कमी झालेले दुधाचे दर, तसेच पशुखाद्य, हिरवा चारा, चुरापेंड यांचे वाढलेले दर यामुळे ग्रामीण भागातील दूध व्यवसायाला घरघर लागली आहे. दरम्यान, भविष्यातील चारा, पाणीटंचाईची चाहूल लागल्याने दावणीला असलेली दुभती जनावरे शेतकरी येईल त्या किमतीला विकू लागला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो.
शेतीतील उत्पन्न पौक लागवडीनंतर किमान सहा महिने तरी येत नाही. तोपर्यंत खर्चासाठी म्हणून दूध व्यवसाय फायदेशीर ठरतो. रासायनिक खतांचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी आता रासायनिक खत सोडून शेणखताकडे वळाला आहे. जर्सी दुभत्या गायीच्या माध्यमातून शेतीला मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होते.
ज्या शेतकऱ्याकडे घरचा चारा उपलब्ध आहे, त्याला दूध व्यवसाय थोडाफार परवडतो; मात्र विकत घेऊन चारा घालणे हे परवडणारे नाही. पशुखाद्य अन् चाऱ्याच्या दरात वाढ व दूधदर कमी अशा विचित्र परिस्थितीमुळे दुग्धव्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे,गेल्या सुमारे महिन्यापासून दुधाचे दर लिटरला चार ते पाच रुपयांनी कमी झाले आहेत. अनेक शेतकर्यांकडे किमान दहा ते पंधरा दुभत्या जसीं गाई आहेत.चांगले दूध देणाऱ्या गाईची किंमत १० हजारांपासून सव्वा लाखापर्यंत आहे. मात्र भविष्यातील धोका ओळखून १० हजारांची गाय ५० ते ६० हजारांना शेतकरी विकू लागला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे उसाचे हिरवे वाहे उपलब्ध आहेत. मात्र कारखाने बंद झाल्यानंतर चाऱ्याची मोठी अडचण होणार आहे. एकूण परिस्थिती पाहिली असता, या सर्व अडचणोंमुळे दूध व्यवसायाला घरघर लागली आहे.