25.7 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeमहाराष्ट्रएसटीच्या नव्या गाड्यांचे समान वाटप व्हावे

एसटीच्या नव्या गाड्यांचे समान वाटप व्हावे

काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे

मुंबई : प्रतिनिधी
एसटी महामंडळात आता नव्या २६४० बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. मात्र या बसेस दाखल करताना काही लोकप्रतिनिधींकडून आपल्या जिल्ह्याला नव्या मिळाव्यात असा प्रयत्न केला जात आहे. धाराशिवचे पालक मंत्री असलेल्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या जिल्ह्याला २५ बसेस पुरविण्याचा आदेश वादग्रस्त ठरला आहे. या निर्णयाला एसटी यूनियन नेत्यांनी विरोध केला आहे..

दरम्यान, सध्या एसटी महामंडळात गाड्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांना सेवा नीट देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे नादुरुस्त गाड्यांच्या बिघाडाने एसटी प्रवाशांचा नाहक खोळंबा होत आहे. अनेक बसेस रस्त्यांत मध्येच बंद पडत आहेत. त्यामुळे एसटीत अशोक लेलँण्ड कंपनीच्या २६४० स्वमालकीच्या गाड्या टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहेत.

या बसेस मोठ्या आकाराच्या असून त्यांची रंगसंगती आणि आसन व्यवस्था चांगली आहे. या बसेस प्रत्येक आगारास समान पद्धतीने वाटप झाल्या पाहिजेत अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. जर प्रत्येक मंर्त्याने पालकमंत्री या नात्याने आप- आपल्या जिल्ह्याला सरसकट सर्वाच्या सर्व बसेस देण्याचा आग्रह करू लागला तर तोट्याच्या मार्गाचा तोटा कोण भरुन काढणार असा सवाल बरगे यांनी केला आहे. एसटीत दाखल होत असलेल्या २६४० गाड्यांचे सम-समान वाटप झाले पाहिजे. एसटी प्रवाशांचा ओघ पाहिला तर सध्या महामंडळाला २२ हजार गाड्यांची गरज आहे, परंतू प्रत्यक्षात एसटीकडे १४,४०० गाड्या शिल्लक आहेत.

त्यामुळे सगळे लोकप्रतिनिधी या गाड्यांसाठी एसटी प्रशासनाकडे आपल्या मतदारसंघात त्या मिळाव्यात यासाठी रेटा लावत आहेत. यामुळे लोकप्रतिनिधी आता परिवहन मंर्त्यांकडे एसटी महामंडळाकडे पत्र व्यवहार करून दबाव आणत आहेत की आमच्या मतदार संघात गाड्या द्याव्यात अशी मागणी करीत आहेत असे श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. परिवहन मंत्र्यांनासांगायचे आहे की एसटीचे तुम्ही पालक आहात, आता एसटीचा नफा आणि तोटा सुद्धा त्यांनी बघितला पाहिजे.

तोटा भरून काढणे गरजेचे : बरगे
कुणाच्या दबावाखाली जर गाड्या दिल्या तर त्यात एसटीचे नुकसान आहे. कारण तोट्याच्या मार्गावर या गाड्या चालविल्या तर होणार नुकसान कोण भरुन काढणार असा सवालही बरगे यांनी घेतला आहे. एसटी महामंडळाला एका दिवसाला साधारण दोन ते तीन कोटी रुपये तोटा होत आहे. येणा-या नवीन गाड्यामधून तोटा भरून काढणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR