केजमध्ये ९ वीत शिकणा-या विद्यार्थ्याने संपवले जीवन

केज (बीड) : केज शहरातील समर्थ नगर भागातील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने केवळ आईने खेळायला जाऊ न दिल्याच्या रागातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. प्रतीक रामेश्वर डोईफोडे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो विवेकानंद विद्या मंदिरात ९ वीच्या वर्गात शिकत होता.

नेमकी घटना काय? रविवारची सुटी असल्याने सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रतीकचा एक मित्र त्याला खेळण्यासाठी घरी बोलवायला आला होता. मात्र, बाहेर ऊन असल्याने आईने प्रतीकला आता ऊन आहे, ४ वाजल्यानंतर खेळायला जा असे म्हणत मित्रासमोर हटकले. या गोष्टीचा राग प्रतीकच्या मनाला इतका लागला की, त्याने आई-वडिलांच्या बेडरूममध्ये जाऊन आतून कडी लावून घेतली आणि पंख्याला गळफास लावला. आई स्वयंपाकघरात कामात व्यस्त असल्याने तिचे बेडरूमकडे लक्ष गेले नाही. दुपारी दीडच्या सुमारास जेवणासाठी त्याला उठवायला गेल्यावर दरवाजा उघडला नाही. शेजा-यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता प्रतीक जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री उशिरा क्रांतीनगर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यालयावर शोककळा, महिनाभरातील दुसरी घटना
धक्कादायक बाब म्हणजे ज्या शाळेत प्रतीक शिकत होता, त्याच शाळेतील तनुजा चाटे या ९ वीच्या विद्यार्थिनीनेही २८ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी महिन्याभराच्या अंतरात टोकाचे पाऊल उचलल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुलांच्या मनातील हा वाढता राग आणि नैराश्य आता चिंतेचा विषय ठरत आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45

Latest news