27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवधाराशिव येथे रेल्वेरोको आंदोलन करणा-या ९० जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव येथे रेल्वेरोको आंदोलन करणा-या ९० जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव : प्रतिनिधी
मराठा समाजाकडून वेगवेगळ््या प्रकारची आंदोलने करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जात असल्याने धाराशिव जिल्हाधिका-यांनी संचारबंदीचे आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करून धाराशिव रेल्वे स्थानकावर रेल्वेरोको आंदोलन करणा-या ८० ते ९० कार्यकर्त्यांवर आनंदनगर पोलीस ठाणे येथे ३१ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, धाराशिव जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिका-यांनी संचारबंदी लागू केली होती. या संदर्भात दिलेल्या आदेशाचे अमोल वसंतराव जाधव (रा. कारी ता. धाराशिव, अभिजीत देशमुख, अनिल माने, कुणाल निंबाळकर, मंगेश निंबाळकर, संकेत सुर्यवंशी, विशाल गडकर, श्रीकांत क्षिरसागर, सत्यजित पडवळ, अक्षय अंकुश नाईकवाडी, निलेश राम साळुंके, अंडु आदरकर, परिक्षीत विधाते, बाळा पाटील, कमलाकर शिंदे, सतिश नाना खडके, अमर गव्हाड यांच्यासह इतर अनोळखी ६० ते ७० व्यक्तींनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वादहा ते साडेअकराच्या सुमारास रेल्वे स्टेशन धाराशिव येथे आंदोलन केले. रेल्वे स्टेशन येथील प्लॅट फॉर्म क्र १ वर रेल्वे रुळावर जिल्हादंडाधिकारी यांचे संचार बंदी आदेश असतानाही जमाव जमवून रेल्वे रोको आंदोलन केले. या प्रकरणी पोलीस नाईक हनुमंत जालिंदर म्हेत्रे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे कलम ३४१, १४३, १८८, भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR