ताडकळस : पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पिंगळी रोडलगत असलेल्या हॉटेल सहर्ष बार जवळील शेतात मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी हरणाच्या ३ ते ४ महिन्यांच्या पाडसावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी शेताकडून घराकडे येत असलेल्या ताडकळस येथील पोले व माठे या यांनी प्रसंगावधान राखत मोकाट कुत्र्यांना हाकलून लावले. त्यानंतर पशुवैद्यकीय विभागाचे राजेश वाघमारे यांच्या मदतीने जखमी पाडसाला ताडकळस पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. शेतक-यांच्या तत्परतेमुळे पाडसाला वेळेवर मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे. या माणुसकीच्या कार्याचे परिसरातून कौतूक होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिस प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे खटिंग व अंगद आयनले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जखमी पाडसाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर माहिती मिळताच वनविभागाचे खटिंग, अंगद आयनले व माणिक इंगोले हे रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास ताडकळस पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हरणाच्या पाडसाला आपल्या ताब्यात घेतले.
या घटनेत शेतकरी पोले व माठे यांनी समचसुचकता दाखवत दाखवली. पशुवैद्यकीय विभागाचे राजेश वाघमारे, पत्रकार लक्ष्मीकांत जवळेकर (स्वामी) यांनी याकामी केलेली तत्पर मदत आणि ताडकळस पोलिस प्रशासनाने वनविभागाशी साधलेल्या समन्वयामुळे जखमी पाडसाला जीवदान मिळाले आहे. वन्यजीवांप्रती माणुसकी आणि संवेदनशीलता जपणा-या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी ताडकळस पोलिस कर्मचारी विष्णू भोसले, आयनले, पत्रकार लक्ष्मीकांत जवळेकर (स्वामी), पशुवैद्यकीय विभागाचे राजेश वाघमारे उपस्थित होते. वन्यजीव संकटात सापडल्यास त्यांना त्रास न देता तातडीने वनविभाग किंवा संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाचे खटिंग व अंगद आयनले यांच्यावतीने करण्यात आले आहे. चांगले शिर्षक द्या.
















