ऐतिहासिक क्षण! पहिल्यांदाच दुर्बिणीद्वारे किडनीच्या कर्करोगावर यशस्वी उपचार

परभणी : विश्वास गुंडावार
जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि परभणीकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. एका ५० वर्षीय रुग्णावर अत्यंत क्लिष्ट अशी किडनीच्या कर्करोगावरची शस्त्रक्रिया परभणीत पहिल्यांदाच लॅप्रोस्कोपी म्हणजेच संपूर्णपणे दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या पार पडली आहे. परभणी आय.सी.यू. व ट्रामा केअर हॉस्पिटल येथे झालेल्या या ऐतिहासिक शस्त्रक्रियेमुळे आता जिल्ह्यातील रुग्णांना अशा गंभीर आजारांच्या उपचारासाठी मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाही.

एका ५० वर्षीय रुग्णाला तीव्र पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना परभणी आय.सी.यू. व ट्रामा केअर हॉस्पिटलच्या ओ.पी.डी. मध्ये आणण्यात आले होते. डॉक्टरांनी तातडीने रोगाचे अचूक निदान करण्यासाठी सोनोग्राफी व इतर आवश्यक तपासण्या केल्या. परंतु, तपासणीचा अहवाल धक्कादायक आला; रुग्णाच्या एका बाजूच्या किडनीला कर्करोगाची मोठी गाठ असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णाचे वय पाहता पारंपरिक पद्धतीने मोठी चीर देऊन ऑपरेशन करणे अत्यंत धोक्याचे आणि क्लिष्ट होते. अशा परिस्थितीत, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आणि त्याला कमीत कमी त्रास व्हावा म्हणून वैद्यकीय टीमने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला.

प्रसिद्ध सर्जन डॉ. भगवान कांबळे यांनी आपल्या कौशल्याचा वापर करत हे ऑपरेशन पारंपरिक पद्धतीने न करता, अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी (दुर्बिणीद्वारे) पद्धतीने करण्याचे ठरवले. ज्यामध्ये कर्करोग झालेली संपूर्ण किडनी दुर्बिणीच्या साहाय्याने शरीराबाहेर काढली जाते. या अत्याधुनिक पद्धतीमुळे रुग्णाला अत्यंत कमी टाके पडले, शस्त्रक्रियेदरम्यान होणारा रक्तस्त्राव नगण्य राहिला आणि वाढत्या वयातही रुग्ण अत्यंत वेगाने व लवकर बरा होण्यास मदत झाली.

तज्ज्ञ डॉक्टरांची टीम वर्क आणि अत्याधुनिक यंत्रणा
ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी परभणीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने अहोरात्र कष्ट घेतले. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सज्ज करण्यापासून ते आय.सी.यू. मधील अत्यंत महत्त्वाच्या पूर्वतयारीची जबाबदारी डॉ. सागर चौधरी, डॉ. गोविंद कदम, भूलतज्ज्ञ डॉ. रवींद्र पाचलेगावकर आणि फिजिशियन डॉ. विकास चोपडे व संपूर्ण वैद्यकीय टीमने चोख बजावली. परभणीत पहिल्यांदाच घडलेल्या या यशस्वी आणि ऐतिहासिक शस्त्रक्रियेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून डॉ. भगवान कांबळे, डॉ. सूर्यकांत देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकायांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही यशोगाथा परभणीच्या वैद्यकीय क्षेत्राला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारी ठरली आहे.

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी ऐन कठीण प्रसंगात आमच्यावर जो दृढ विश्वास दाखवला, तो खरोखर मोलाचा होता. लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेत अत्यंत पारंगत असलेले डॉ. भगवान कांबळे यांची अफाट कुशलता, संपूर्ण वैद्यकीय टीमचे अथक परिश्रम आणि आपल्या हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचार पद्धती व सुसज्ज आय.सी.यू. यामुळेच आपण परभणीच्या इतिहासात हा मैलाचा दगड पार करू शकलो. रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळून दिलासा मिळाला, याचे आम्हास आत्मिक समाधान आहे असे परभणी आय.सी.यू. अँड ट्रामा केअरचे संचालक डॉ. सूर्यकांत देशमुख यांनी म्हटले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21
Video thumbnail
Nanded|अपमानाचा बदला घेण्यासाठी व्यापाऱ्याची लूट; LCBचा मोठा खुलासा!
01:59
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातील पाणी डिसेंबरपर्यंत पुरेल – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
03:16
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाचा 'लपंडाव'; शेतकरी हवालदिल
03:08
Video thumbnail
Latur|ढोर सांगवीतील दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
01:09
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
32:11
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51

Latest news