28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रविल पॉवर मजबूत असेल तर माणूस काही करु शकतो : खडसे

विल पॉवर मजबूत असेल तर माणूस काही करु शकतो : खडसे

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. सुधारणा झाल्यानंतर त्यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळीच एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था केल्याने खडसे यांचे प्राण वाचण्यास मदत झाली होती. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तब्येतीची विचारपूस केली असल्याचे यावेळी खडसे यांनी सांगितले. विल पॉवर मजबूत असेल तर माणूस काही करु शकतो, आपण लोकसभेलाही सामोरे जायला तयार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, हृदयविकाराच्या धक्क्यानंतर आपण वाचू की नाही याची खात्री नव्हती, मात्र मी मुक्ताईच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने एवढ्या संकटातून वाचलो. फडणवीस यांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला. माझ्या प्रकृतीची काळजी घेणारे भाजपप्रेमी आपल्याला कमळ फूल देऊन शुभेच्छा देत आहेत. कमळ हे फूल म्हणून आपण स्वीकारत असल्याचेही खडसे यांनी सांगितले. उत्खनन प्रकरणात १३७ कोटी दंडाची नोटीस बजावणे आणि त्रास देणे हे राजकीय हेतूपोटीच सुरु आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा विकास हा फक्त ठेकेदारांपुरता मर्यादित आहे, खरा विकास शून्य असल्याचा आरोप त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR