36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeधाराशिवतुळजापूर बसस्थानकात प्रवाशाची सोन्याची चैन चोरीला

तुळजापूर बसस्थानकात प्रवाशाची सोन्याची चैन चोरीला

धाराशिव : प्रतिनिधी
उत्तर सोलापूर तालुक्यातील येमाई मार्डी येथील एका प्रवाशाची सोन्याची चैन तुळजापूर येथील बसस्थानक येथून बसमध्ये चढताना चोरट्यांनी लंपास केली. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येमाई मार्डी ता. उत्तर सोलापूर येथील मनोज लहु साठे हे २८ ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथे आले होते. ते २८ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नविन बसस्थानक तुळजापूर येथे बसमध्ये चढत होते. त्यावेळी मनोज साठे यांचे गळ्यातील सव्वा तोळे वजनाची सोन्याची साखळी अंदाजे किंमत ३१ हजार रूपये किंमतीची चोरट्याने गर्र्दीचा फायदा घेवून चोरुन नेली. या प्रकरणी मनोज साठे यांनी दि. २८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR