18.9 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeधाराशिवविझोरा येथील दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी गुत्तेदाराच्या विरोधात गुन्हा

विझोरा येथील दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी गुत्तेदाराच्या विरोधात गुन्हा

धाराशिव : प्रतिनिधी
वाशी तालुक्यातील विझोरा येथे टाकीचे बांधकाम करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन बालकांचा मृत्यू ८ ऑक्टोबर रोजी झाला होता. या दोन बालकांच्या मृत्यूस टाकीचे बांधकाम करणारा गुत्तेदार कारणीभूत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित गुत्तेदाराच्या विरोधात वाशी पोलीस ठाणे येथे २८ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील विझोरा येथील प्रविण कल्याण साळुंके (वय ८ वर्षे) व कन्हैय्या कल्याण साळुंके या दोन बालकांचा ८ ऑक्टोबर रोजी खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणारा अज्ञात गुत्तेदार यांनी सार्वजनिक जागी खड्डा खोदुन ठेवल्याने व त्या खड्ड्यात पाणी साचल्याने प्रविण साळुंके व कन्हैय्या साळुंके हे त्या खड्ड्यात पडून मयत झाले. या प्रकरणी फिर्यादी महादेव संभाजी वाघमारे यांनी दि. २८ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR