८ हजारांचा प्रश्नपत्रिका संच ८० हजार रुपयांत!

भिवंडी : प्रतिनिधी
देशभरात नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्रातील ६ लाखांपेक्षा जास्त भावी शिक्षकांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका छापखान्यातून अवघ्या ८ हजार रुपयांमध्ये बाहेर काढलेला प्रश्नपत्रिकेचा संच दलालांच्या जाळ््यांतून फिरत-फिरत जेव्हा भिवंडीत पोहोचला, तेव्हा त्याची किंमत तब्बल ८० हजार रुपयांवर गेल्याचा खळबळजनक खुलासा पोलिस तपासात झाला.

शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणा-या लाखो उमेदवारांच्या आयुष्याशी खेळणा-या या टीईटी पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश भिवंडी पोलिसांनी केला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित छापखान्यातील कर्मचारी नरेशकुमार याने हा अत्यंत गोपनीय पेपर मुख्य फरार आरोपी बिजेंद्र गुप्ताचा साथीदार सोनू याला अवघ्या ८ हजार रुपयांत विकला होता. यानंतर बिजेंद्र गुप्ताने आपल्या विविध राज्यांमधील एजंट्स आणि दलालांच्या साखळीचा वापर करून हा पेपर सुरुवातीला ८० हजार रुपयांना विकला.

पुढे जसा जसा हा पेपर प्रत्येक टप्प्यावरील दलालांकडे गेला, तसा तसा त्यांनी स्वत:चा मोठा नफा त्यात जोडला. भिवंडीतील ग्राहकांपर्यंत हा पेपर पोहोचेपर्यंत त्याची किंमत तब्बल १.५ कोटी रुपयांवर गेली होती. गोपनीयता राखण्यासाठी परीक्षा परिषदेने राज्याबाहेरील आग्रा येथील अत्यंत गोपनीय महीम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड या छापखान्यात छपाईची जबाबदारी दिली होती. येथे सुरक्षा असतानाही टीईटीचा पेपर फोडला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपी बिजेंद्र गुप्ता हा अत्यंत शातिर आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत असे. देशभरातील विविध राज्यांच्या गोपनीय प्रश्नपत्रिका ज्या छापखान्यांत छापल्या जातात, अशा ठिकाणांची तो आधी माहिती काढायचा. त्यानंतर तेथील कर्मचा-यांना पैशांचे मोठे आमिष दाखवून आपल्या जाळ््यात ओढायचा. कोणत्याही राज्याची प्रश्नपत्रिका छापायला आली की, ती कर्मचा-यांच्या मदतीने चोरून संबंधित राज्यातील एजंटांमार्फत लाखो रुपयांना विकली जात असल्याचे तपासात उघड झाले. टीईटीच्या पेपर-१ आणि पेपर-२ चे प्रत्येकी दोन संच छापले जात असल्यामुळे परीक्षेच्या दिवशी कोणताही एक संच निवडण्याचा नियम होता. याचाच गैरफायदा घेत नरेशकुमारने सलग तीन दिवस सुरक्षेला चकवा देऊन चारही संच छापखान्याबाहेर काढले आणि ते मुख्य आरोपीच्या साथीदाराला आणून दिले.

बिजेंद्र गुप्ता पेपरफुटी रॅकेटचा मास्टरमाईंड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्रश्नपत्रिकेची मूळ प्रत हस्तगत करण्यात आली. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य मास्टरमाईंड बिहारचा रहिवासी बिजेंद्र गुप्ता हा असून तो सध्या फरार आहे.

सुरक्षा यंत्रणेला ठेंगा दाखवत चोरला पेपर
२८ जून रोजी होणा-या महाराष्ट्र टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तर प्रदेशातील आग्रा येथील महीम पत्रम प्रायव्हेट लिमिटेड या छापखान्यात छपाईसाठी पाठवण्यात आली होती. तिथे सुरक्षेची चोख व्यवस्था असतानाही तिथला कर्मचारी नरेशकुमार मौहर ऊर्फ निकी याने सुरक्षा यंत्रणेतील पळवाटा शोधून प्रश्नपत्रिका बाहेर काढली. छापखान्यातून बाहेर पडताना केवळ कपड्यांची वरवर झडती घेतली जात असल्याचे नरेशकुमारने हेरले होते.

बुटाच्या इनसोलमध्ये लपवून आणले पेपर
१५ ते १७ जूनदरम्यान छपाई सुरू असताना प्रेसमधील कर्मचारी नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निक्की याने प्रश्नपत्रिकेची पाने घडी करून ती बुटाच्या इनसोलखाली लपवली. सुरक्षा रक्षकांनी शरीराची तपासणी केली, पण बुटांची नाही. याचाच फायदा घेत त्याने सलग तीन दिवस पेपर-१ आणि पेपर-२ चे चारही संच छापखान्याबाहेर काढले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news