पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज रद्द करा

मुंबई : देशभरात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याबाबत अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत, त्याचबरोबर विरोधकांनी इंधनाच्या दरात सातत्याने होणा-या वाढीबाबत सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. जयंत पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

जयंत पाटलांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. यामुळे केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल. कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांना केली. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

पत्रामध्ये काय म्हणाले जयंत पाटील?
आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, खाद्यतेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. त्यात भरीस भर पेट्रोल-डिझेलचे वाढणारे दर घालत आहेत. केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहेत. आज पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहे. मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा ही वाढ केली जात आहे. आज घडीला मुंबईत १११.१२ रु. प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे तर डिझेल ९६.८६ रु. प्रति लिटर मिळत आहे. त्यामुळे या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या संकटसमयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
BIG BREAKING|खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याचा अपघात;चार गाड्या एकमेकांवर आदळल्या
00:58
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची आणखी एक मोठी कारवाई;शिवराज मोटेगावकर यांचे बँक लॉकर सील
03:00
Video thumbnail
nanded|आमदार चिखलीकरांनी मध्यरात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट
04:20
Video thumbnail
Nanded|श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय: नांदेडमध्ये शिवसैनिकांची गर्दी!
03:40
Video thumbnail
जळकोट तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी हवालदिल
02:12
Video thumbnail
Shivraj Motegavkar|खोपेगाव शिवारातील कोटींची इमारत चर्चेत;प्रशासनाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह?
02:39
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. मनोज शिरूरे अटकेत;CBI ची मोठी कारवाई
03:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. शिरूरेनं मोटेगावकरला पेपर विकला?;मोटेगावकरचा मुलगा होणार माफीचा साक्षीदार?
03:01
Video thumbnail
Latur|तोंडार पाटीजवळ दाळ मिलच्या गोदामाला भीषण आग;अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
01:19
Video thumbnail
इंडिगो पायलटच्या कॅमेऱ्यात कैद भारत-पाक सीमेचे विलोभनीय रूप, रात्रीच्या झगमगाटाचा व्हिडिओ व्हायरल!
00:33
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
01:03:45
Video thumbnail
"लातूरमध्ये केवळ कायद्याचेच राज्य चालेल", अनियमितता आढळल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत - अमित देशमुख
16:31
Video thumbnail
Nanded|नरसीत डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
02:31
Video thumbnail
Nanded|मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ ; युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur| शासनाच्या वाहतूक धोरणा विरोधात गोडावून हमालांचा एल्गार.
04:42

Latest news